Kandenavami 2025: चातुर्मास सुरु होण्यापूर्वी का बनवतात कांदा भजी? काय असते कांदे नवमी? जाणून घ्या महत्व

Why is Kandenavami celebrated before Chaturmas: चातुर्मास सुरू होण्यापूर्वी कांदे भजी खाण्याची खास परंपरा सांगणारा कांदे नवमीचा सण महाराष्ट्रात साजरा होतो.
Kande Navami 2025
Kande Navami 2025sakal
Updated on

What is the meaning of Kande Navami in Marathi tradition: वर्षातील चार महिने म्हणजेच चातुर्मास ६ जुलैपासून सुरू होत आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा हा काळ धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. चातुर्मासाच्या काळात कुठलाही शुभ कार्य, जसे की लग्न, गृहप्रवेश, मुंडन यांसारखी विधी परंपरेने टाळले जातात.

या काळात अनेक भक्त शाकाहार, ब्रह्मचर्य आणि सात्विक आहाराचे पालन करतात. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य या गोष्टींना पूर्णतः वर्ज्य मानले जाते. याचसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकजण कांदा, लसूण आणि वांगीदेखील खात नाहीत. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यावेत यासाठी चातुर्मास सुरू होण्याआधी, विशेषतः आषाढ शुद्ध नवमीच्या दिवशी ‘कांदे नवमी’ साजरी केली जाते.

कांदे नवमी

कांदे नवमी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध नवमी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी ती ५ जुलै रोजी आहे. या दिवशी घराघरात कांद्याचे विविध पदार्थ करून एक प्रकारे चविष्ट मेजवानीचा आनंद घेतला जातो. कांदे पोहे, कांद्याची भजी, कांद्याचा झुणका, झणझणीत थालीपीठ, कांद्याची चटणी, कांद्याच्या पिठपेरलेल्या भाज्या अशा अस्सल चविष्ट जेवणाने पानं सजवली जातात.

या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायासाठीही हा वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरमध्ये वारीचा सोहळा पार पडतो. याच दिवशी देवशयनी एकादशी असून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चार महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला देवउठनीसह जागृत होतात.

चातुर्मास हा संयम, साधना, भक्ती आणि सात्त्विकतेचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्यासाठी उपवास, व्रतवैकल्य, भजन, कीर्तन, जप-तप केले जातात.

कांदे नवमीची ही खास परंपरा आपल्या खाद्यसंस्कृतीत एक वेगळं स्थान घेऊन आहे. चव, श्रद्धा आणि परंपरेचं हे सुंदर मिश्रण सणांचा खरा गोडवा सांगतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com