

Kartiki Ekadashi 2026: Tithi, Pandharpur Wari & Vrat Rules
esakal
Pandharpur Kartiki Ekadashi 2026 Significance: वारकरी संप्रदायात कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. विशेषतः महाराष्ट्रात या सोहळ्याला मोठे स्थान असून, विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा केली जाते. उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि दानधर्मातून या व्रताचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.