
Kedarnath Dham History: चारधामांपैकी एक प्रसिद्ध असलेले केदारनाथ मंदिराचे आज सकाळी ७ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिर बंद असते, परंतु उन्हाळ्याच्या आगमनासोबत मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येते. प्रत्येक वर्षी ही प्रक्रिया होते, ज्यामुळे भाविकांना दिव्य अनुभव मिळवता येतो. २ मे रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी आधीच मोठी गर्दी जमा झाली होती. मंत्रांचे गजर सुरू असताना दरवाजे उघडले गेले आणि भोलेनाथाच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर गजरात दुमदुमला होता. पण तुम्हाला माहितीय का भगवान शंकराचा निवासस्थानाचा इतिहास भगवान विष्णू, नर-नारायण, पांडव यांचा केदारनाथशी काय संबंध आहे हे जाणून घेऊ