
Hidden Places Kedarnath: केदारनाथ मंदिर आजपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे. केदारनाथला जाण्यासाठी प्रथम हरिद्वार किंवा ऋषिकेशला जावे लागते. या दोन्ही ठिकाणांहून बस किंवा वैयक्तिक वाहनाने सोनप्रयागला पोहोचावे लागते आणि मंदिराची चढाई सोनप्रयागपासून थोड्या अंतरावर असलेल्या गौरीकुंडपासून सुरू होते. केदारनाथचा ट्रेक गौरीकुंडपासून सुरू होतो आणि केदारनाथ मंदिरापर्यंत जातो. हे जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे, परंतु या ट्रेकमध्ये येणाऱ्या काही सर्वोत्तम ठिकाणांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. याच ठिकाणांबद्द्ल जाणून घेऊया.