Ketu Astrology Prediction: केतु ग्रह तब्बल १८ महिन्यांनंतर १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५:०८ वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार, केतुला मायावी आणि पाप ग्रह मानले जाते, परंतु विशिष्ट काळात त्याचा गोचर शुभ फलदायकही ठरू शकतो..या वेळी केतुचे गोचर काही राशींना आश्चर्यकारक लाभ देणारे ठरेल. विशेषतः मिथुन, कन्या, तुला, धनु आणि मकर राशींना या कालावधीत जीवनात सकारात्मक बदल, आर्थिक लाभ आणि यशाची संधी मिळू शकते..Eating Late at Night: उशिरा जेवल्यास वाढतो वजन आणि फॅट, जाणून घ्या रात्रीची योग्य वेळ?.Career Opportunities: कला असो की विज्ञान? सर्वच शाखांमध्ये आहेत करिअरच्या नवीन संधी!.मिथुनकेतूचा गोचर तिसऱ्या भावात होत असल्याने तुमचं आत्मभान, धैर्य आणि संवादकौशल्य यामध्ये लक्षणीय वाढ होईल. हा काळ तुमच्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा आणि इतरांशी सकारात्मक संबंध निर्माण करण्याचा आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास घडण्याची शक्यता आहे, जे तुमच्या मानसिक स्थैर्याला आधार देतील. कार्यस्थळी तुमचं योगदान ओळखलं जाईल आणि टीममधून चांगला प्रतिसाद मिळेल. भावंडांशी तुमचे संबंध बळकट होतील. याशिवाय, या काळात एखाद्या मौल्यवान वस्तू किंवा मालमत्तेत गुंतवणुकीची संधी मिळू शकते..कन्या१८ मे २०२५ पासून केतूचा गोचर तुमच्या बाराव्या भावात होणार असून, हा काळ तुम्हाला आतल्या जगात डोकावण्याची संधी देईल. एकांत, ध्यान आणि आत्मविश्लेषण याकडे तुमचा कल वाढेल. तुमचं लक्ष बाह्य गोष्टींपेक्षा मानसिक शांतता आणि अध्यात्माकडे वळेल. परदेश प्रवास, मोक्षकारक साधना किंवा गूढ विद्यांमध्ये रस निर्माण होऊ शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः आरोग्य आणि अध्यात्मिक कारणांसाठी. मात्र, ही गुंतवणूक दीर्घकाळात तुमच्या आत्मविकासाला चालना देणारी ठरेल. जुन्या मानसिक बंधनांपासून मुक्त होण्यासाठी हे संक्रमण अनुकूल ठरेल.तुळकेतू अकराव्या भावात गोचर करत असल्यामुळे तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि सामाजिक नात्यांमध्ये नवे वळण येईल. जुने मित्र दूर जातील, तर काही नव्या आणि अर्थपूर्ण ओळखी होतील. या काळात तुम्ही आत्मपरीक्षण, साधना आणि शांततेच्या शोधात राहाल. आर्थिक लाभ संधीच्या स्वरूपात येईल, पण त्यासाठी धैर्य आणि संयमाची गरज असेल. तुमचं लक्ष आता केवळ लाभावर नसून, त्यामागील उद्दिष्ट आणि समाधानाकडे असेल..Career Opportunities: कला असो की विज्ञान? सर्वच शाखांमध्ये आहेत करिअरच्या नवीन संधी!.धनुकेतूचा नवव्या भावातील गोचर तुमच्यात अध्यात्मिक जागृती निर्माण करेल. तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देण्याची, तीर्थयात्रा करण्याची किंवा साधना, ध्यानात गुंतण्याची शक्यता आहे. नशिबाचा पाठिंबा काही वेळा कमी वाटेल, पण प्रयत्नांमुळे यश नक्की मिळेल. गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. हा काळ तुम्हाला कर्म, नीतिमत्ता आणि जीवनाच्या गूढतेचा वेगळा दृष्टिकोन देईल.मकरआठव्या भावात होणारा केतूचा गोचर तुमच्या आयुष्यात गूढ, परिवर्तन आणि अनपेक्षित घटना घेऊन येईल. काही गुप्त आर्थिक स्रोतांमधून लाभ होऊ शकतो जसे की वारसा, विमा किंवा अचानक आलेले धन. जुन्या आरोग्यविषयक त्रासांपासून सुटका मिळू शकते. आत्मचिंतन, तत्त्वज्ञान, ज्योतिष किंवा मनोविज्ञान यांसारख्या विषयांमध्ये रस वाढेल. हा काळ तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची ओळख करून देणारा ठरेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.