Diwali Festival 2022 : नेपाळ-मॉरिशियसमधील दिवाळी भलतीच निराळी

Diwali Festival
Diwali FestivalSakal

Diwali Celebration in Nepal And Mauritius : भारतातील राज्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगळी असून, हा उत्सव जवळजवळ सर्व राज्यांमध्ये 5 दिवस चालतो. भारताव्यतिरिक्त आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये तसेच अनेक पाश्चात्य देशांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खरं तर, अनिवासी भारतीयांसाठी हा सण म्हणजे मातृभूमिशी अधिक जवळ येण्याचा सण असतो. या उत्सवात केवळ परदेशातील भारतीयच नव्हे तर, सर्वच धर्माचे लोक एकत्र येत हा सण साजरा करतात. आज आपण ब्रिटन, मॉरिशस आणि नेपाळसह भारतातील विविध राज्यांमध्ये कशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

ब्रिटनमध्ये अशी साजरी होते दिवाळी

भारताबाहेर दिवाळीचा सर्वात मोठा उत्सव ब्रिटनमधील घनदाट जंगलाने वेढलेल्या लीसेस्टर शहरात साजरा केला जातो. येथे वास्तव्यस असणारे हिंदू, जैन आणि शीख समुदाय हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. एवढेच नव्हे तर, इतर धर्मांचे लोकही हा सण आपला सण म्हणून साजरा करतात. येथे लोक दिवाळीत दिवे लावण्यासोबतच, मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजीचा आनंद घेतात. तसेच उद्यानात आणि रस्त्यावर एकत्र जमून उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

नेपाळ आणि मॉरिशसमध्ये, नवविवाहित करतात हे विशेष काम

ब्रिटनशिवाय नेपाळ आणि मॉरिशसमध्येदेखील भारताप्रमाणेच दिवाळी साजरी केली जाते. परंतु येथे नवविवाहित वधूकडून दिवे लावण्याची परंपरा आहे. मलेशियामध्ये दिवाळीला लोकांना सुट्टी जाहीर केली जाते. तर, नेपाळमध्ये दिवाळीला तिहार असे संबोधले जाते. भारताप्रमाणेच येथेही गणेश-लक्ष्मीची पूजा केली जाते. नेपाळमध्ये हा सण पाच दिवस साजरा केला जातो. येथेदेखील दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. येथे पहिला दिवस गायीसाठी समर्पित असतो. यादिवशी गायीची पूजा करून भोजन केले जाते. दुसरा दिवस हा कुत्र्यांसाठी समर्पित असतो. तिसऱ्या दिवशी येथे दिवे लावले जातात. चौथ्या दिवशी येथे मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते तर, पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.

गोव्यात रांगोळीचे मोठे महत्त्व

सुंदर सागरी किनारपट्टीवर वसलेल्या गोव्यात गोवावासीयांची दिवाळी पाहण्यासारखी असते. पारंपारिक नृत्य आणि गाण्यापासून सुरुवात करून दिवाळीत पारंपारिक पदार्थांची चव चाखली जाते. याशिवाय येथे रांगोळी काढण्याचे खूप महत्त्व आहे.

आंध्र प्रदेशात असते हरीची कथा

आंध्र प्रदेशात हरिकथा किंवा भगवान हरीची संगीत कथा अनेक ठिकाणी सादर करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने नरकासुराचा वध केला. त्यासाठी येथे सत्यभामेच्या विशेष मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते.

गुजरातमध्ये लावले जातात तुपाचे दिवे

गुजरातमध्येही दिवाळीसण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कोणताही नवीन उद्योग, मालमत्तेची खरेदी, कार्यालय उघडणे, नव्या दुकानाची सुरूवात आदी विशेष प्रसंग शुभ मानले जातात. दिवाळीच्या दिवशी गुजरातमध्ये रात्रभर घरोघरी देशी तुपाचे दिवे लावले जातात. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी या दिव्यांच्या ज्योतीतून निघणारा धूर एकत्र करून काजळ बनवले जाते.असे केल्याने वर्षभर समृद्धी येते अशी धारणा येथील नागरिकांमध्ये आहे.

विभीषणाच्या आदेशानुसार श्रीलंकेत सुरू झाली दिवाळी

रावणाचा वध केल्यानंतर विभीषण लंकेचा राजा झाला. त्याने असत्यावर सत्याच्या विजयाच्या स्मरणार्थ दिव्यांच्या उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर श्रीलंकेतील लोक दिवाळी अमावस्येच्या दिवशी दिवे लावतात. भारताप्रमाणे श्रीलंकेतही सलग पाच दिवस दिवाळी उत्सव सुरू असतो.

आदिवासी लावतात यमराजाच्या नावाचा दिवा

भारतातील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील आदिवासी भागात दिवे लावण्याची प्रथा आहे. याकाळात येथील आदिवासी स्त्री-पुरुष नृत्य करतात. तर, येथील आदिवासी लोक धनत्रयोदशीच्या दिवसापासून यमराजाच्या नावाने दिवा लावतात. घरात मृत्यूसारखी अप्रिय घटना घडू नये म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा लावला जातो.

महाराष्ट्रात केली जाते गायीची पूजा

महाराष्ट्रात दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे पहिला दिवस वसुर बारस म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये गाय आणि वासराची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी येथे धन आणि गुळाची पूजा करण्याची परंपरा आहे.

कर्नाटकात तेलस्नान

कर्नाटकात अश्विजा कृष्ण आणि बली पदयामी ज्याला नरका चतुर्दशी असे दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दिवशी येथे तेलाने स्नान करण्याची परंपरा आहे. नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या शरीरातील रक्ताचे डाग दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले होते, असे मानले जाते. येथे दिवाळीचा तिसरा दिवस बली पदयामी म्हणून ओळखला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com