Ganesh Jayanti: गणेश जयंती निमित्त जाणून घ्या मुहूर्ताची वेळ, तिथी आणि धार्मिक महत्त्व...

जो कोणी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला दैवी सुख प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Ganesh Jayanti Dinvishesh
Ganesh Jayanti Dinvisheshesakal

Maghi Ganesh Jayanti 2023: हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात गणपतीला समर्पित असं अत्यंत महत्त्वाचं व्रत म्हणजे गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी. हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. याच दिवशी गणेशाचा जन्म झाला.  

Ganesh Jayanti Dinvishesh
Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थी निमित्त फराळासाठी बनवा खास उपवसाची इडली

गणेशाच्या जन्माचे स्मरण म्हणून ही जयंती साजरी केली जाते. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. यंदा गणेश जयंती 25 जानेवारी (बुधवारी) रोजी साजरी होणार आहे. गणेश जयंतीच्या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची जन्मकथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने जाणून घ्या मुहूर्ताची वेळ, तिथी आणि धार्मिक महत्त्व.

Ganesh Jayanti Dinvishesh
Food: बाप्पाला चतुर्थी निमित्त दाखवा मोदक खीरीचा नैवेद्य

तिथी आणि मुहूर्त :

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थीची सुरूवात २४ जानेवारीच्या रात्रीच होते आहे आणि दुपारी १२.४५ पर्यंत असणार आहे अन् चंद्रोदय संध्याकाळी ०६.३० चा आहे. दुपरच्याच वेळेत बाप्पाला तिळगूळाचा नैवेद्य दाखवावा. 

Ganesh Jayanti Dinvishesh
Ganesha Chaturthi 2021: बाप्पाच्या चौदा विद्या, चौसष्ट कला कोणत्या?

माघी गणेश जयंती पूजा विधी :

एका चौरंगावर लाल कापड आंथरून घ्या. देवघर किंवा पूजास्थळ फुलांनी आणि दिव्यांनी सजवा. गणपतीची मूर्ती एका तामन्हात घ्या, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करून बाप्पाचा अभिषेक करा. गणपतीला स्वच्छ पुसून लाल कापडावर अक्षदा ठेवून त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवा. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. नैवेद्य म्हणून तिळ-गूळ किंवा त्याचे लाडू किंवा मोदक अर्पण करा. या दिवशी चुकूनही चंद्राच दर्शन घेयचं नसतं.

Ganesh Jayanti Dinvishesh
Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

गणेश जयंतीचे महत्त्व :

हिंदू धर्मग्रंथानुसार माता पार्वतीने श्री गणेशाची निर्मिती आपल्या मळापासून केलेली त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. जो कोणी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला दैवी सुख प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Ganesh Jayanti Dinvishesh
Fashion Tips : आउटफीटनुसार योग्य ते सॉक्स घाला, नाहीतर इंप्रेशन होणार...

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. अनेक गणेशभक्‍तांनी याच दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला आहे.

Ganesh Jayanti Dinvishesh
Men's Fashion: ब्लेझर घेताय? पुण्याच्या या ठिकाणी आहे १ हजारापर्यंतचे बेस्ट ऑप्शन!

गणेशजयंतीला गणेशतत्त्वाचा फायदा होण्यासाठी काय करावे? 

या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्‍न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्‍ति व चैतन्य यांचा जास्त फायदा होतो. गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यासही फायदा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com