
Kojaagiri Pournima 2025
sakal
Kojaagiri Pournima 2025: अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र मोठया उत्साहात साजरी केली जाते. घटस्थापनेचा घट बसवून पुढच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अनेक स्थानिक मंदिरांमध्ये देवीची रोज आरती केली जाते. भोंडला, गरबा, दांडिया हे खेळ खूप उत्साहात आणि जल्लोषात खेळले जातात. हा सण देवीचा नऊ दिवस चालू असलेला दैत्यांसोबतचा लढा आणि नंतर नवव्या दिवशी देवीने केलेला महिशासुराचा वाढ हे साजरा करण्यासाठी केला जातो. दशमीच्या दिवशी हा विजय साजरा केला जातो आणि दशहरा साजरा केला जातो.