

Kojagari Purnima Rituals for Wealth
Sakal
कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी काही सोप्या ज्योतिषीय उपायांचे पालन करा. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, त्यामुळे योग्य विधींनी पूजा करून धन, संपत्ती आणि समृद्धी वाढवता येते. पांढरी फुले, पिवळ्या कढई आणि खीर अर्पण करून देवीला प्रसन्न करा.
Kojagari Purnima Rituals for Wealth: यंदा कोजागिरी पौर्णिमा ६ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. हा सण आश्विन शुल्क पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात अशी मान्यता आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार रात्री काही उपाय केल्यास धन समृद्धी लाभू शकते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने, गरिबी आणि आर्थिक संकट कमी होईल सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तसेच जीवन सुख, समृद्धी, संपत्ती आणि वैभवाने भरलेले असते. कोजागरी पौर्णिमेला कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.