Kojagiri Poornima: कोजागिरी पौर्णिमेची पूजा विधीवत रित्या कशी करावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kojagiri Poornima

Kojagiri Poornima: कोजागिरी पौर्णिमेची पूजा विधीवत रित्या कशी करावी?

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा केली जाते. तिची आठ रूपे आहेत, ती धनलक्ष्मी, धनलक्ष्मी, राज लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, ऐश्वर्या लक्ष्मी, संतना लक्ष्मी, कमला लक्ष्मी आणि विजय लक्ष्मी. मातेची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. घरातील मंदिर स्वच्छ करून माता लक्ष्मी आणि श्री हरी यांच्या पूजेची तयारी करा. यासाठी एका पाटावर लाल किंवा पिवळे कापड पसरवा. त्यावर माता लक्ष्मी आणि विष्णूजींची मूर्ती स्थापित करावी.

हेही वाचा: kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका?

देवासमोर तुपाचा दिवा लावा, गंगाजल शिंपडा आणि अक्षतेचा टिळा लावा. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईने भोग अर्पण करा आणि फुले अर्पण करा. गुलाब असतील तर अजून चांगले.गाईच्या दुधात बनवलेली तांदळाची खीर लहान भांड्यात भरावी. आता त्यांना चंद्राच्या प्रकाशात चाळणीने झाकून ठेवा.

यानंतर ब्रह्म मुहूर्तावर उठून गणपतीची आरती झाल्यानंतर भगवान विष्णु सहस्रनामाचा जप, श्रीसूक्ताचा पाठ, श्रीकृष्णाचा महिमा, श्रीकृष्ण मधुराष्टकम् आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. दुस-या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून देवी लक्ष्मीला खीर अर्पण करून घरातील सदस्यांना खिरीचा प्रसाद वाटावा.

हेही वाचा: Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

कोजागिरी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?

शरद पौर्णिमा रविवार, 9 ऑक्टोबर 2022 रोजीशरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय - संध्याकाळी 5 वाजून 51 मिनिटंपौर्णिमा तिथीची सुरुवात पौर्णिमा तिथी संपेल - 10 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 2 वाजून 24 मिनिटांनी.

टॅग्स :MilkcultureHistory