
Koradi Temple Navratri 2025 | Record 5,551 Ghatas Installed for Festival
sakal
Navratra 2025: कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार, यंदा विक्रमी ५५५१ घटांची स्थापना करण्यात येणार असून भाविकांना अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. दररोज सकाळ व संध्याकाळी महाआरतीसोबत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.