Krishna Janmashtami recipe: मखान्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makhana ladoo recipe in Marathi

Krishna Janmashtami recipe: मखान्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

हिंदू परंपरेनुसार, जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट 2022 रोजी जन्माष्टमीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाचे आयोजन केले जाईल. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. चला तर मग आज आपण बघू मखान्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

हेही वाचा: Krishna Janmashtami: पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू कसे तयार करायचे?

साहित्य:

चार चमचे तुप

दोन वाटी मखाना

अर्धा वाटी काजू

अर्धा वाटी बदाम

अर्धा वाटी खोबरं

दोन वाटी गूळ

कृती:

सर्वप्रथम कढईत तूप घालून त्यामध्ये मखाने चांगले परतून घ्यावे.

नंतर परतलेले हे मखाने थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करुन घ्यावी.

काजू आणि बदाम यांचीही मिक्सरवर बारीक पूड करुन घ्यावी.

कढईमध्ये पुन्हा तूप घालून त्यामध्ये बारीक किसलेले खोबरे परतून घ्यायचे.

त्याच कढईत आधी बारीक केलेले मखाना आणि काजू-बदाम पावडर घालून सगळे नीट एकत्र करुन घ्यायचे.

हे सगळे मिश्रण एका भांड्याचत काढून घ्यावे.

कढईत पुन्हा दोन चमचे तूप घालून त्यात गूळ घालून त्या गुळाचा पाक करुन घ्यायचा.

हा पाक भांड्यात काढलेल्या मिश्रणावर घालून त्याचे एकसारखे लाडू वळायचे.

Web Title: Krishna Janmashtami Recipe Makhana Ladoo Recipe In Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..