
एखादे बाळ जेव्हा जन्म घेते तेव्हा त्यांच्या जन्माची वेळ महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रसुती कक्षात घड्याळं प्रामुख्याने लावलेली दिसतात. कारण, बाळाच्या जन्माची वेळच त्याच्यावर येणाऱ्या चांगल्या अन् वाईट वेळेची मांडणी करते असे ज्योतिषशास्त्र सांगते. बाळाच्या जन्माची वेळ, वार यावरून त्याची कुंडली बनवली जाते.
जन्मताच आपल्यासोबत आई-वडिलांचे नाव अन् कुंडली जोडली जाते.कारण, कुंडली आपल्यावर येणारी संकटे, आपल्या प्रगतीचा पाढाच आपल्यासमोर मांडते. कुडलीत असलेले काही दोष आपल्याला त्यामुळे कळतात. म्हणूनच, कुंडली महत्त्वाची मानली जाते.