
Lakshami Pujan 2025 Date:
Sakal
लक्ष्मीपूजनाची तारीख निश्चित करण्यासाठी प्रदोषकाळात अमावस्या मिळण्याची स्थिती पाहिली जाते. महाराष्ट्रात कधी आणि जगभरात कोणत्या तारखेला लक्ष्मीपूजन केल जाणार आहे हे आज जाणून घेऊया.
Lakshmi Puja Date 2025 Maharashtra India world: दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीच लक्ष्मीपूजन अमावस्येला करण्यात येतं. त्याविषयी मागच्या वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा अनेक कॅलेंडर आणि पंचागामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केलेली आहे. म्हणजेच चुकीची तारीख आपल्या समोर प्रदर्शित करण्यात येत आहे. हे टाळण्यासाठी लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख नक्की कोणती याबाबात पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.