
Lakshmi Kuber Pujan 2025 Date and Muhurat
sakal
Laxmi Kuber Pujan 2025 Date and Time: यंदा लक्ष्मी-कुबेर पूजन शास्त्र नियमाप्रमाणे मंगळवार, २१ ऑक्टोबरला करायचे आहे, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, 'धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय इत्यादी ग्रंथांत म्हटल्याप्रमाणे पूर्व दिवशी प्रदोषव्याप्ती असून, दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावास्या व्याप्ती असेल. अमावास्येपेक्षा प्रतिपदा अधिक काळ असल्यास लक्ष्मी पूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावास्येच्याच दिवशी करावे. दिवाळीचा सण साजरा करताना अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती यांचा अंधार दूर होऊन ज्ञान, उद्योगीपणा, स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीती यांचा प्रकाश सर्वत्र पसरो, अशी प्रार्थना करू या. पर्यावरणाचे भान ठेवू या, असे आवाहन सोमण यांनी केले आहे.