Life Lesson from Lord Hanuman: जीवनात यश मिळवण्यासाठी हनुमानाकडून शिका हे गुण, अडचणी होतील दूर 

हनुमान बलवान, बुद्धीमान विद्यावान आणि ज्ञानी तर होतेच शिवाय ते अत्यंत विनम्र होते. योग्य वेळी योग्य कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याची त्यांच्यामध्ये कला होती. सध्याच्या काळामध्ये धडपड करणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांच्यातील जीवन जगण्याचं मॅनेजमेंट स्किल शिकणं गरजेचं आहे.
हनुमान आणि व्यवस्थापकीय कौशल्ये
हनुमान आणि व्यवस्थापकीय कौशल्येEsakal

जीवनामध्ये पैश्यांपेक्षा महत्वाच्या अशा अनेक गोष्टी आहेत. जीवनात जर प्रेम, आदर,यश, प्रतिष्ठा मिळवायची असेल तर काही गुण आत्मसात करणं गरजेचं आहे. आयुष्यात काही गोष्टींचं योग्य नियोजन Planning केलं तर आयुष्य अधिक सुखकर होण्यास मदत होते. आयुष्य सुखकर होण्यासाठी देखील काही मॅनेजमेंट स्किल्स management skills असणं गरजेचं आहे. Learn Many Things from Lord Hanuman Management Guru

खरं तर आपल्या देव देवतांमध्ये Gods देखील अशा काही व्यवस्थापन आणि नियोजन गुण होते जे आजच्या काळामध्ये आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे का श्रीरामाचा परमभक्त आणि आपला सगळ्यांसाठी पूजनीय असा मारुतीराया म्हणजेच हनुमान Hanuman एक कुशल व्यवस्थापक Management होते. मन, कृती आणि वाणी यांचा समतोल कसा राखावा हे मारुतीकडून शिकण्यासारखे आहे. 

हनुमान बलवान, बुद्धीमान विद्यावान आणि ज्ञानी तर होतेच शिवाय ते अत्यंत विनम्र होते. योग्य वेळी योग्य कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याची त्यांच्यामध्ये कला होती. सध्याच्या काळामध्ये धडपड करणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांच्यातील जीवन जगण्याचं मॅनेजमेंट स्किल शिकणं गरजेचं आहे. 

शिकण्याची जिद्द- भगवान हनुमान लहानपणापासूनच अत्यंत बुद्धीवान होते. नवंनवीन ज्ञान ग्रहण करण्यासाठी ते कायम उत्सुक असतं.  त्यांनी त्यांचे पिता केसरी आणि आई अंजनीकडून अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. तसंच धर्मपिता पवन यांच्याकडूनही शिक्षा ग्रहण केली होती. 

त्याचसोबत शबरीचे गुरू ऋषि मतंग  आणि सुर्य देवता यांच्याकडून विविध विद्या शिकल्या होत्या 

हे देखिल वाचा-

हनुमान आणि व्यवस्थापकीय कौशल्ये
Hanuman Original Name: बजरंगबली नव्हे तर ‘हे’ आहे भगवान मारुतीचं खरं नाव?, जाणुन घ्या नावाची कथा

कार्यक्षमता आणि निपुणता- मारुतीराया म्हणजेच भगवान हनुमान कोणतही कार्य हाती घेतलं की ते संपूर्ण केल्यावाचून थांबायचे नाही. प्रत्येक कामामध्ये ते निपुण होते. सुग्रीवाची मदत करण्यासाठी हनुमाने श्रीराम आणि सुग्रीवाची भेट घडवून दिली. तर पुढे लंका दहनापर्यंत श्रीरामांच्या आदेशाप्रमाणे बुद्धी कौशल्याचा वापर करून कार्य केलं. हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. 

समुद्र पार करून लंका गाठण्यासाठी देखील मोठ्या कुशलतेने त्यांनी लंका गाठली. 

नेतृत्वगुण- हनुमान संपूर्ण वानरसेनेचे सेनापती होते. त्यांच्यामध्ये उत्तम नेतृत्वगुण होते. लंकेमध्ये रावणाशी दोन हा करण्यासाठी निघालेली वानरसेनेची युद्धाची ती पहिलीच वेळ होती. त्यापूर्वी वानर सेनेने कधीही युद्धात सहभाग घेतला नव्हता. मात्र हनुमानाच्या नेतृत्वाने आणि जिद्दीने वानसेनेने लंकेवर विजय मिळवला. 

साहसी वानर सेनेचे मार्गदर्शक बनून आणि सगळ्याचा सल्ला एकूण त्यांनी पुढील नियोजन केलं. ज्यामुळे लंकेपर्यंतचा प्रवास तसचं सीतामातेला शोधणं त्यांना शक्य झालं. एकंदरच नेतृत्व करत असताना इतरांचा सल्ला किंवा विचारांनाही महत्व देणं गरजेचं आहे हे हनुमानाच्या गुणांमधून स्पष्ट होतं. 

विनम्रता- हनुमान अत्यंत बलशाली होते. तसचं ते बुद्धीवान आणि शक्कीशाती होते मात्र तरिही ते अत्यंत विनम्र होते. हनुमानाने लंका दहन केलं तसचं भीमाचा अंहकार दूर केला. एवढचं नाही तर अर्जुन, शनिदेव, बलराम यांचा अंहकारही त्यांनी दूर केला. या सगळ्या महान योद्धा आणि शक्तीशाली पुरुषांचा अहंकार मोडला असला तरी त्यांनी विनम्रता सोडली नाही. 

याचाच अर्थ तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही मोठ्या पदावर असलात तरी विनम्र राहून व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. 

समयसूचकता- हनुमानजींध्ये असलेल्या समयसूचकतेची अनेक उदाहरणं सांगता येतील. कठीण प्रसंगी आपल्या बुद्धीमत्तेने योग्य तो निर्णय घेऊन त्यांनी अनेक संकट दूर केली. मेघनादाच्या बाणाने मूर्छित झालेल्या लक्ष्माचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाला संजीवनी आणण्यासाठी हिमालय पर्वत रांगांमध्ये जाण्यास सांगितलं. हनुमान उडू शकत असल्यामुळे त्यांना पाठवण्यात आलं होतं. 

हुनमानाला संजीवनी बुटी कोणती हे ठाऊक नसल्याने त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला. बुटी शोधण्यात त्यांनी वेळ दवडला नाही. यामुळे लक्ष्मणाचा जीव वाचला. 

अशा प्रकारे भगवान हनुमानातील अनेक गुण हे आजच्या काळातही एका उत्तम व्यवस्थापकासाठी तसचं यशस्वी जीवन जगण्यासाठी गरजेचे आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com