

libra weekly horoscope (5 to 11 April 2026)
esakal
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा प्रगती, समन्वय आणि यशाचा ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे बुद्धिकौशल्य आणि संवाद कौशल्य विशेष प्रभाव टाकेल. अनेक गोष्टी सामोपचाराने मार्गी लावण्यात तुम्ही यशस्वी ठराल. व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही काळापासून अडकलेले प्रकल्प आता गती घेतील आणि पूर्णत्वाकडे जातील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढ किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सकारात्मक ठरतील. जीवनाला नवी दिशा मिळेल आणि भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेता येतील.