Meera Story : श्रीकृष्णाच्या प्रेमात वेडी झालेली मीरा कोण होती? विष प्यायला मागे पुढे पाहिले नाही

मीराबाईच्या आयुष्यातील काही गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Meera Story
Meera Storysakal
Updated on

 भक्त कसा असावा आणि भक्ति कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे मीराबाई (Meera Bai). लहानवयात त्यांच्यासोबत असे काही घडले की त्यानंतर किशोरावस्थापासून मृत्युपर्यंत मीरा ने श्रीकृष्णालाच सर्व मानले. पण तुम्हाला माहिती का या मीरा बाई कोण होत्या?

आपण मीराबाईला फक्त ‘श्रीकृष्ण भक्त’ म्हणूनच ओळखतो. मीराबाईच्या आयुष्यातील काही गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (life inspirational story of Meera who lost in the love of lord Shri Krishna)

मीराबाई हे फक्त एक नाव नाही तर त्यांची भक्ती, आस्था आणि श्रद्धा याचं उत्तम उदाहरण आहे. मीराबाईचा जन्म संवत् 1504 विक्रमी मध्ये मेड़तामध्ये राजा रतन सिंह यांच्या घरी झाला होता. मीरा जोधपुरच्या राठोड रतनसिंहची एकमेव मुलगी होती.

राजपूत जातिमध्ये जन्मलेल्या मीराबाईला घरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र लहानपणी मीराबाईसोबत असं काही घडलं की त्यांनी संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाला समर्पित केले आहे.

जेव्हा मीराबाई आठ वर्षाची होती तेव्हा मोहल्ल्यातील एक वरात पाहून मीराबाईने आपल्या आईला विचारले की माझा नवरदेव कोण तर यावर तिच्या आईने मीराबाईला सांगितले होते की श्रीकृष्ण हा तुझा नवरा आहे. या घटनेनंतर मीराबाईने श्रीकृष्णलाच आपलं सर्वस्व मानलं आणि त्यांच्या भक्तीत लीन झाल्या.

ती श्रीकृष्णच्या मुर्तीला अंघोळ घालायची. नवे वस्त्र घालायची, नैवद्य द्यायची, गीत गायची आणि नृत्य करायची. किशोरवस्थामध्ये मीराने श्रीकृष्णला आपला पति मानले होते.

Meera Story
Astrology Tips : असं म्हणतात भाग्य कपाळावर लिहिलेलं असतं, पण कपाळ स्वभावही सांगतो हे माहितीये?

मीराबाईचा विवाह महाराणा सांगाचे पुत्र भोजराज यांच्याशी झाला जे समोर महाराणा कुंभा म्हणून ओळखू लागले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मीराने तिच्या पतिला सांगितले होते की ती फक्त श्रीकृष्णाची आहे. मात्र महाराणा कुंभने मीराची ही गोष्ट हलक्यात घेतली. पण हळूहळू श्रीकृष्णापती मीराची भक्ति पाहून त्यांना विश्वास झाला की मीरा श्रीकृष्णची भक्त आहे. ती मंदिरात जाऊन नृत्य गायन करायची आणि भजन गायची. मीराच्या या वागण्यामुळे तिचे सासरचे लोक वैतागले होते.

Meera Story
Panchang 17 December: आज काळे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

काही काळानंतर मीराच्या पतिचा एका युद्धात मृत्यू झाला. पतिच्या मृत्युनंतर जेव्हा मीरा होण्यास सांगितले तेव्हा मीरा म्हणाली माझा नवरा श्रीकृष्ण आहे. मीरा पतिच्या मृत्यूनंतरही मंदिर जायची आणि भजन-गीत गायची आणि नृत्य करायची.

यावर मीराच्या सासरच्या लोकांनी मीरावर व्यभिचारी असल्याचा आरोप करत तिला दिलेला विषचा प्याला पिण्यास सांगितले. मीराने श्रीकृष्णचं नाव घेत विष पिले. सर्वांना वाटले की मीरा आता जीवंत राहणार नाही. मात्र श्रीकृष्णच्या कृपेने मीरावर विषचा कोणताही प्रभाव पडला नाही.

Meera Story
Krishna river : कृष्णेचे पाणी कर्नाटकातून महाराष्ट्रात

मीराचा मृत्यू कसा झाला?

सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला. सासरच्या लोकांना कंटाळून मीराने महल सोडला आणि अनेक ठिकाणी तीर्थासाठी गेली आणि अखेर वृंदावनला पोहचली. मीराने महल सोडल्याने राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. ब्राह्मणांनी सांगितले की जर मीरा परत आली तर सर्व ठिक होणार.

मीराच्या शोधात दोन सैनिक पाठविण्यात आले. त्यांनी मीराला परत येण्याची विनंती केली मात्र मीराने नकार दिला. सैनिक म्हणाले जर तुम्ही आमच्यासोबत परतला नाही तर आम्ही पण परत जाणार नाही. आमच्या कुटूंबाबाबत विचार करा.

मीराने सैनिकांना सांगितले की माझा तुम्ही येण्याच्या आधीच मृत्यू झाला असता तर तुम्ही रिकाम्या हाती गेला असता. त्यावर सैनिक म्हणाले, 'हो'. असं म्हणताच मीरा ने एकतारचे बाहेर काढले आणि श्रीकृष्णचे भजन गायला लागली. मीराच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रु येत होते आणि त्याच वेळी ती श्रीकृष्णच्या मुर्तीत सामावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com