Astrology Tips : असं म्हणतात भाग्य कपाळावर लिहिलेलं असतं, पण कपाळ स्वभावही सांगतो हे माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astrology Tips

Astrology Tips : असं म्हणतात भाग्य कपाळावर लिहिलेलं असतं, पण कपाळ स्वभावही सांगतो हे माहितीये?

What Your Forehead Says About You : चेहरा बोलतो असं म्हणतात. पण बऱ्याचदा त्याचा संबंध मुख्यत्वे डोळ्यांशी लावला जातो. पण फक्त डोळेच नाही तर नाक तोंड, चेहऱ्याचा आकार, बोटांची लांबी, ओठांचा आकार अशा बऱ्याच गोष्टी बरंच काही सांगत असतात. तसंच तुमचं कपाळही तुमचा स्वभाव, व्यक्तीमत्व सांगत असतं असं सामुद्रिक शास्त्रात सांगितलं आहे. जाणून घ्या कसं.

मोठं कपाळ

मोठं कपाळाचे लोक सल्ले देण्यात हुशार असतात. मल्टीटास्कर असतात. संतुलित असतात. मल्टी टॅलेंटेडपण असतात. त्यांच्याकडे विश्लेषणात्मक बुध्दी असते. हे लोक स्वतंत्र आणि मोकळ्या विचारांचे असतात. नेतृत्व गुण असतात. सामान्यतः रॉयल, सेलिब्रिटीज, उद्योजक मोठे कपाळ असलेले असतात.

अखुड कपाळ

हे लोक सोशल असतात पण स्वतःची कंपनी जास्त एन्जॉय करतात. हे लोक तार्किक किंवा बौध्दिक स्तरावर निर्णय घेण्याऐवजी भावनांना महत्व देणं पसंत करतात. यांना सर्जनशीलतेत, कंस्ट्रक्टिव्ह गोष्टींतून आनंद मिळतो. अत्यंत संवेदनशील असतात. स्वतःच्या डोक्याने काम करायला आवडते. नात्यात प्रामाणिक असून दीर्घकाळ टिकून राहतात.

घुमटाकार कपाळ

कर्व्हड किंवा घुमटाकार कपाळाचे लोक मिळूनमिसळून राहणारे, सहज आणि हसमुख स्वभावाचे असतात. फ्रेंडली स्वभावाचे असतात. हे लोक सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात. हे लोक सतर्क, कुशाग्र, चंट आणि तेवढेच शालीनही असतात. यांची लोकांवर छाप पडते. इतरांना प्रेरणा मिळते, परिस्थितीवर मात करण्याची यांच्यात क्षमता असते.

टॅग्स :Astrology