
Magh Pornima 2023 : माघ पोर्णिमेला जुळून येणार 4 शुभ योग; जाणून घ्या तिथी अन् मुहूर्त
Magh Pornima 2023 : हिंदू धर्मात माघ महिना अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जात असला तरी या महिन्यातील पोर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नान करून दान केल्याने अनेक पुण्यांचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी जे व्रत करतात त्यांना १० हजार अश्वमेध यज्ञाइतके फळ मिळते. या दिवशी भगवान सत्यनारायणासोबत चंद्र आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. यावेळची माघ पोर्णिमा या दृष्टीनेही विशेष आहे, कारण या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत.
तिथी
हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पोर्णिमा 4 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9.29 ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.58 पर्यंत असेल. अशा स्थितीत माघ पौर्णिमा उगवत्या तिथीनुसार ५ फेब्रुवारीला साजरी केली जाईल.
शुभ योग
यावेळी माघ पोर्णिमेच्या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत. सर्व प्रथम, दुपारी 2.42 पासून आयुष्मान योग केला जाईल. यानंतर सौभाग्य योग सुरू होईल तर दुसरीकडे रविपुष्य योग सकाळी 7.07 ते 12.13 पर्यंत असेल. यासोबतच सकाळी 7.07 ते दुपारी 12.12 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल.
महत्त्व
माघ पोर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. माणसाला सौभाग्य प्राप्त होते. बिघडलेली कामे पुन्हा होऊ लागतात. या दिवशी केशर असलेली खीर अवश्य अर्पण करा. (Tradition)
डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.