शिवसंस्थान चांडस येथील श्री चंद्रेश्वर शिवलिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha shivaratri special

शिवसंस्थान चांडस येथील श्री चंद्रेश्वर शिवलिंग

मालेगाव : शिवलिलामृतामध्ये वर्णन असलेले व्याधाचा उद्धार करणारे शिवलिंग श्री चंद्रेश्वर संस्थान तालुक्यातील चांडस येथे आहे. तिथे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात .

शिकारीच्या शोधात छोट्या तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या बेलाच्या झाडावर पारधी बसलेला असतो. तो बेलाची पाने तोडून खाली टाकतो. ती जमिनी खाली असलेल्या शिवलिंगावर पडून महादेवाला बेलाचा अभिषेक घडतो. श्री शंकर प्रसन्न होतात व त्या पारध्याचा (व्याधाचा ) उद्धार करतात. त्या धटनेपासूनच महशिवरात्री पर्वास सुरुवात झाली, अशी मान्यता आहे.

ही कथा जिथे घडली ते ठिकाण म्हणजे श्री चंद्रेश्वर संस्थान होय. हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. गर्भगृहामध्ये श्री चंद्रेश्वरांचे शिवलिंग आहे. मंदिराचे बांधकाम दक्षिण भारतीय पद्धतीचे आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. त्यामध्ये शिववाहन नंदीची मुर्ती आहे. सभामंडपात श्री रामदेव बाबांची मूर्ती आहे. मंदिर परिसरात श्री कृष्ण मंदिर, श्री गजानन महाराज, श्री विठ्ठल रुख्मिणी यांची मंदीरे आहेंत

मंदिरालगत बाराही महिने पाणी असलेली बारव (विहीर ) आहे. तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आकर्षक प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. मालेगाव- मेहकर राज्यमहामार्गावर मालेगावपासून १० किमी अंतरावर हे संस्थान आहे.

भाविकांची गर्दी

श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. महशिवरात्रीला येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

तीर्थक्षेत्राचा विकास करावा

या तीर्थक्षेत्राचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करावा. त्यामुळे भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतील. परिसरातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असॆ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घुगे म्हणाले.

टॅग्स :Maha Shivaratri Festival