
Mahashivratri 2025 Date and Time: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खुप महत्व आहे. महाशिवरात्री हा सण भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. महाशिवरात्री भगवान शिवाच्या भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो. हा सण देशभरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी भव्य शिव मिरवणुका काढल्या जातात. ज्यामध्ये भाविक मोठ्या आनंदाने सहभागी होतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव-गौरीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी येते. या दिवशी उपवास करून आणि भोलेनाथाची पूजा केल्याने, अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो.