
Maha kumbh Mela 2025 Guide: हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याला खुप महत्व आहे. भारतात भरला जाणारा हा सर्वात मोठा मेळावा आहे. महाकुंभ मेळा उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. यंदा १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. यावेळी या महान उत्सवात कोट्यवधी भाविक सहभागी होऊन गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमात स्नान करतात. महाकुंभ मेळाचे वैशिष्ट्य काय आणि स्नानाच्या शुभ तारखा कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.