
Life Lessons From Mahavir For Peaceful Living: महावीर जयंती हा जैन समाजाच्या अनेक सणांपैकी एक सण आहे. त्यांच्यासाठी हा अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस आहे. मात्र हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, मानवतेच्या आदर्श मूल्यांचा संदेश देणारा दिवस आहे. या दिवशी जैन बांधव विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा, कलश यात्रा, शोभायात्रा आणि प्रवचनांचे आयोजन करून भगवान महावीरांना श्रद्धांजली अर्पण करतात.