Mahavir Jayanti 2024: महावीर जयंतीसाठी खास थाळी, कांदे-लसणाशिवाय बनवा हे ५ पदार्थ

Mahavir Jayanti 2024: जैम धर्माचे २४ वे तीर्थंकार महावीर स्वामींचा जन्म कल्याण महोत्सव साजरा केला जातो.
Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2024:esakal

Mahavir Jaynti 2024 Recipes : शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. या दिवशी २४ वे तीर्थंकार भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याण महोत्सव साजरा केला जातो. जैन धर्मात या दिवसाला खास महत्व आहे. या खास दिवशी जैन मंदिरांमध्ये भगवान महावीरांचा जन्म उत्सव असतो. या खास दिवशी नैवेद्यपण खासच असतो. या दिवशी कांदे लसणाशिवाय नैवेद्याची थाळी कशी बनवाल, जाणून घ्या रेसिपी.

१) मसाला भेंडी

 • यासाठी भेंडी आधी धूवून पूसून घ्या.

 • लांब लांब चीरा.

 • कढईत तेल गरम करून घ्या. त्यात जीरे, मोहरी घालून फोडणी द्या. त्यात लाल मिरची तळून घ्या.

 • त्यात लाल तिखट, धणे पूड, हळद घाला.

 • यात भेंडी घालून नीट हलवा आणि थोड्यावेळ शिजू द्या.

 • भेंडी शिजल्यावर त्यात मीठ, आमचूर पावडर घाला.

 • मसाला भेंडी तयार.

२) बटर पनीर मसाला

 • टोमॅटो स्वच्छ धूवून मिक्सरमधून बारीक करून घ्या.

 • त्यातच काजूची पेस्टही बनवा.

 • एका कढईत थोडं तूप गरम करा. त्यात खडा मसाला टाका.

 • नीट परतल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट टाका.

 • त्यात मसाले घाला. ५-७ मिनीट शिजवा.

 • त्यात काजू पेस्ट आणि बटर घाला.

 • वरून थोडी साखर घाला.

 • मग पनीरचे क्युब टाका.

 • वरून गरम मसाला, आमचूर पावडर आणि मग कसूरी मेथी घालून नीट मिक्स करा.

Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2023 : मोह,राग,द्वेषरूपी शत्रूंना जिंकलं अन् ते बनले 'महावीर'

३) ग्रेव्ही छोले

 • ग्रेव्ही छोले बनवण्यासाठी ७-८ तास छोले भिजवलेले हवेत.

 • छोले, मीठ आणि हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.

 • कढईत तूप गरम करून घ्या. त्यात जीरे मोहरी आणि टोमॅटो प्युरी टाकून शिजवून घ्या.

 • आता सगळे मसाले घाला आणि ४-७ मिनीटं परतून घ्या.

 • आता यात छोले टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाका.

 • यात थोडं चहा पावडरचं पाणी घालू शकतात.

 • उकळ आल्यावर गरम मसाला आणि आमचूर पावडर घालावी.

 • त्यावर कोथिंबीर घालून गार्निश करावे.

४) बूंदी रायता

 • एका भांड्यात बुंदी घेऊन ती पाण्यात भिजवत ठेवा.

 • आता ताजं दही घेऊन ते फेटून घ्या.

 • त्यात थोडं दूध घालून पातळ करून घ्यावं.

 • त्यात मीठ, काळ मीठ, जीरेपूड, चाट मसाला, पुदीना पावडर आणि चिली फ्लेक्स टाका.

 • बुंदीतलं पाणी काढून दह्यात घाला.

 • नीट मिक्स करा आणि बुंदी रायता तयार.

५) फ्रुट कस्टर्ड

 • जैन थाळीत तुम्ही हे फ्रुट कस्टर्ड ठेवू शकतात.

 • यासाठी थोडं दूध घ्या आणि त्यात कस्टर्ड पावडर घाला.

 • एका भांड्यात दूध उकळवून घ्या आणि त्यात कस्टर्ड पावडरचं दूध आणि साखर घाला.

 • याला थंड होऊ द्या.

 • नंतर त्यात आपल्या आवडीने फळ घाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com