Makar Sankrant 2023 : काळजी घ्या, यंदाची संक्रांत 'या' खास लोकांवर असणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankrant 2023

Makar Sankrant 2023 : काळजी घ्या, यंदाची संक्रांत 'या' खास लोकांवर असणार

- पं. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती

Makar Sankrant 2023 : पौष कृष्ण अष्टमी १४ जानेवारी रोजी रात्री 8:44 वा. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार. त्यामुळे मकर संक्रांत १५ जानेवारीला साजरी केली जाणार.

या संक्रांतीचे वाहन वाघ आहे तर उपवाहन घोडा आहे . संक्रातीने पिवळे वस्त्र धारण करुन हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे. पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे तर सर्प जाती आहे. (Makar Sankrant 2023 grace and curse on people side effects)

संक्रातीने भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव राक्षसी असून नक्षत्र नाव मंदाकिनी आहे . दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असून ईशान्य दिशेस पहात आहे. ही संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात.

अशावरुन कोणासाठी संक्रांत कोणासाठी चांगली आणि कोणासाठी वाईट यावरुन जाणून घेता येतं. संक्रांती काळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते. .

संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी हे दान करावे

देश काल कथन करून " मम् आत्मन: सकल पुराणोक्त फल प्राप्तर्थ्य श्री सवितृ प्रीतीद्वारा सकल पापक्षय पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय ( अमुक ) दानं करिष्ये " असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी .

यात नवे भांडे , गाईला घास , अन्न , तीळपात्र , गुळ , सोने , भूमी , गाय , वस्त्र , घोडा , इत्यादी यथाशक्ती दान करावे .

हेही वाचा: Makar Sankrant 2023 : लहान मुलांचं बोरन्हाण का करतात?

जन्म नक्षत्रावरुन संक्रांतीची शुभ-अशुभ फले

१) हस्त ,चित्रा ,स्वाती :- प्रवास असणार

२) विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा,उत्तराषाढा ::- सुख आणि सौख्य लाभेल.

३) श्रवण , धनिष्ठा ,शततारका :- रोग -आजारांपासून सावध रहावे.

४) पूर्वाभाद्रपदा , उत्तराभाद्रपदा , रेवती , अश्विनी , भरणी ,कृत्तिका -: यांना वस्त्र लाभ होणार.

५) रोहिणी ,मृग ,आर्द्रा , :- नुकसान होण्याची शक्यता आहे.

६) पुनर्वसू ,पुष्य ,आश्लेषा ,मघा ,पूर्वा ,उत्तरा , :- उत्तम द्रव्य लाभ होणार

हेही वाचा: Makar Sankrant : महाराष्ट्रात गोड गोड बोलायची मकर संक्रांत इतर राज्यात कशी साजरी होते

संक्रांतीचा पर्वकाळ 15 जानेवारी रविवार सूर्योदयापासून पासून सूर्यास्तापर्यंत आहे .या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे , तिलमिश्रित उदकाने स्नान , तिलहोम , तिलतर्पण , तिलभक्षण , तिलदान करावे, असे केल्यास सर्व पापांचा नाश होतो .