Makar Sankranti 2023: मकरसंक्रांतीला खण देण्याची परंपरा काय सांगते?

महाराष्ट्रात सवाष्ण महिला खण पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. खणाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते.
khan on Makar Sankranti says
khan on Makar Sankranti saysEsakal

महाराष्ट्रात सवाष्ण महिला खण पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. खणाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढावी. पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर खण मांडावे. खण मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे. काळ्या रंगाचे मोठे खण खाली त्यावर लाल रंगाचे खण ठेवून दोन्हीत वाण भरावे. खणवर अक्षता, फुले, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर धूप, दीप अर्पण करावे. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.

khan on Makar Sankranti says
Makar Sankranti 2023: भोगी स्पेशल पारंपरिक पद्धतीने आमसुलाची कढी कशी तयार करायची?

वेगवेगळ्या भागात मकरसंक्रांतीला खण देण्याची परंपरा कशी आहे?

काही ठिकाणी विशेषत: कोकणात काळ्या खणावर लाल खण पालथे ठेवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी खण दान करण्याची प्रथा आहे. एकमेकांकडे जाऊन याकाळात सवाष्ण महिला वाण लूटतात. कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते. त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले. तर विदर्भात पाच खण आणुन त्याची मनोभावे पूजा करून एक घरातील देवघरात, दुसऱ्या दारातील तुळशीला तर उरलेले तिन खण सवाष्ण महिलांना देण्याची पद्धत आहे.

khan on Makar Sankranti says
Makar Sankranti 2023: भोगी स्पेशल कळण्याची पुरी आणि भरीत कसे तयार करायचे?

आता बघू या खण म्हणजे काय? 

मकरसंक्रांतीला खणाची पूजा केली जाते, हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या खणांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. काही भागात या खणांना  सुगड देखील म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. 'सुघट' या शब्दाचा तो अपभ्रंश होय. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घड. या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com