Mars Transit 2026
esakal
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. मंगळाचे हे गोचर पुढील ९ मार्च २०२७ पर्यंत राहणार आहे. म्हणजेच पुढील १०४ दिवस मंगळ सूर्याच्या स्वामित्वाच्या सिंह राशीत विराजमान असेल. या काळात मंगळासोबत सूर्याचाही प्रभाव राशींच्या जीवनावर दिसून येईल. ज्योतिषीय गणनेनुसार या बदलाचा विशेष फायदा चार राशींना होण्याची शक्यता आहे. यामध्ये सिंह, मेष, मिथुन आणि वृश्चिक राशींचा समावेश आहे. या काळात काहींना नोकरीत प्रगती, तर काहींना व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात.