
Festivals Celebrated at Historic Sangameshwar Temple: नाग नदी नागपूरची ओळख. बर्डीवर या नाग नदीचा आणि ओढ्याचा संगम होतो, त्याठिकाणी पुरातन शिवमंदिर असून श्रावणातल्या सोमवारी इथे भाविकांची गर्दी होते.
नाग नदी आणि ओढ्याच्या संगमावर असल्यामुळे हे शिवमंदिर संगमेश्वर नावाने ओळखले जाते. पूर्वी नाग नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि वाहते होते. भोसले राजघराण्यातील लोक आणि इतर येथे स्नान, जलक्रीडेसाठी येत असत. नदीमध्ये नौकाही चालत असत. या पवित्र ठिकाणी मंदिर असावे, असे दुसऱ्या रघुजींच्या मातोश्री चिमाबाई यांना वाटले आणि १७८९ साली इथे मंदिराचे निर्माण करण्यात आले.