
Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा लक्ष्मीचा फोटो, धनसंपत्तीने भरेल घर
Mata Lakshmi Photo Vastu Tips : हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची देवी मानलं गेलं आहे. लक्ष्मीची कृपा झाली तर माणसाला अपार सुख-समृध्दी आणि धनाची प्राप्ती होते असं मानलं जातं. वास्तूशास्त्रात देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरात देवीचा फोटो किंवा मुर्ती ठेवणे हा आहे. पण ते नक्की कोणत्या दिशेला ठेवावं हे पण महत्वाचं आहे.
देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवण्याचे वास्तू नियम
वास्तूशास्त्रानुसार कधीही दक्षिण दिशेला लक्ष्मीचा फोटो लावू नये. असं केल्याने घरात गरिबी येते. आणि साठवलेला पैसाही जातो.
उभ्या लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवू नये. नेहमी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो ठेवावा.
हेही वाचा: Vastu Tips: बाहेरून आल्यानंतर चप्पल नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी?
घरात ठेवायला सगळ्यात शुभ फोटो किंवा मूर्ती तिच ज्यात लक्ष्मी देवी कमळाच्या फुलावर बसून धन वर्षाव करत असेल आणि सोबत दोन हत्ती असतील.
हा फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासाठी सगळ्यात शुभ दिशा उत्तर समजली जाते. त्यामुळे घरात सुख, समृध्दी, धन, धान्य आणि वैभव येतं असं मानलं जातं.
हेही वाचा: Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!
याशिवाय ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर- पूर्व दिशेच्या मधला कोपरा. इथे फोटो किंवा मूर्ती ठेवू शकतात. यात देवीचं मुख असं ठेवा की तुमच तोंड उत्तरेकडे होईल.
देवीची मूर्ती एकतर धातूची किंवा मातीची असावी. प्लास्टिक किंवा पीओपीची नसावी.
कधीही देवीची खंडीत मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये. यामुळे घरात समस्या वाढतात.