Mercury Rise 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्त्व आहे. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचा कारक मानला जातो. त्यामुळे बुधाच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम सर्व राशींवर होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. सध्या बुध ग्रह तूळ राशीत असून, ११ नोव्हेंबर रोजी तो अस्त अवस्थेतून उदय होणार आहे. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी सकाळी बुध पुन्हा अस्त होईल. म्हणजेच या काळात बुध ग्रह उदय अवस्थेत राहणार आहे.