Mercury Transit 2026
esakal
ग्रहांच्या राशीबदलाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतो. सध्या बुध ग्रह तूळ राशीत गोचर करत असून, २ डिसेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र असून, बुध आणि शुक्र यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध मानले जातात. त्यामुळे हा गोचर काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, संवादकौशल्य आणि आर्थिक व्यवहारांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या काळात नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. या गोचराचा पाच राशींना विशेष फायदा मिळू शकतो.