
Ghatasthapana 2025
Sakal
आजपासून शारदीय नवरात्री सुरू झाली आहे.
पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळचा होता.
पण तुमचा सकाळचा मुहूर्त चुकला असेल तर अभिजात मुहूर्त कलश स्थापना करू शकता.
How to perform Kalash Sthapana in Abhijit Muhurat 2025: शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्राच्या या नऊ दिवसांत माता दुर्गा पृथ्वीवर वास करते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते आणि नवव्या दिवशी कन्या पूजनाने संपते.
नवरात्रात शुभ मुहूर्तात घटस्थापना करणे शुभ मानले जाते. आज घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:09 ते 8:06 पर्यंत होता, एकूण कालावधी 1 तास 56 मिनिटे होता. जर काही लोक या शुभ मुहूर्तानुसार घटस्थापना करू शकले नाहीत, तर त्यांच्यासाठी कलशस्थापना करण्याचा आणखी एक वेळ आहे.