Shashi Yog Lucky Zodiac Signs: आज चंद्राचा वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश; जाणून घ्या शशि योगामुळे तुमच्यावर होणारा परिणाम

Effects of Shashi Yoga on Zodiac Signs Today: आज चंद्राचा मिथुन राशीत प्रवेश होऊन शशि योग तयार होतोय; जाणून घ्या तुमच्या राशीवर त्याचा काय परिणाम होईल.
Shashi Yoga Impact on All Zodiac Signs
Shashi Yoga Impact on All Zodiac Signssakal
Updated on

Horoscope predictions for 24 June 2025 based on moon transit: आज मंगळवार, 24 जून 2025 रोजी चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. रोहिणी आणि मृगशीर्ष या नक्षत्रांमुळे चंद्राची स्थिती बलवान राहील. सूर्य आणि बुधही चंद्राशी शुभ योग तयार करत आहेत. त्यामुळे हा दिवस मेष, कर्क आणि कुंभ राशीसाठी विशेषतः लाभदायक ठरणार आहे. शशि योग निर्माण झाल्यामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळेल, तसंच कार्यक्षेत्रातही प्रगती होईल.

मेष

आज तुम्ही जोमाने कामाला लागाल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. काही चांगल्या गोष्टी किंवा आनंददायक घटना घडू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस लाभदायक असून नव्या साधनसुविधा प्राप्त होतील.

वृषभ

नवीन लोकांशी ओळख होईल. हे संबंध भविष्यात उपयुक्त ठरतील. कामात काही अडचणी असतील, पण योग्य नियोजनाने त्यातून मार्ग काढता येईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस योग्य आहे.

मिथुन

दिवसाच्या पहिल्या सत्रात थोडी आर्थिक चिंता असू शकते, मात्र दुसऱ्या सत्रात स्थिती सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क

आज नशिबाची साथ मिळेल. मौल्यवान वस्तू मिळू शकते. कामात वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. करिअर किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल.

सिंह

दिवस संमिश्र आहे. मन थोडं अस्थिर होईल, पण संयम राखल्यास कामात यश मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सासूरवाडीकडून संबंध सुधारण्याची शक्यता आहे.

कन्या

धार्मिक-आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. कामात चपळपणा आवश्यक आहे. छोटी लाभदायक संधी गमावू नका. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.

तूळ

अडून राहिलेली कामं पूर्ण होतील. अनोळखी लोकांपासून थोडं दूर राहा. अचानक लाभ किंवा एखाद्या जुन्या संपर्कातून फायदेशीर संधी मिळू शकते.

वृश्चिक

नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. जोडीदाराशी नातं मजबूत होईल. सासूरवाडीकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

धनु

व्यवसायात फायदा होईल, पण खर्चही वाढतील. तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज चांगले उत्पन्न मिळेल. उधारी देणे टाळा.

मकर

कामात प्रगती होईल, पण परिश्रम करावे लागतील. जुने मित्र किंवा नातेवाईक मदतीला येतील. कामाची दखल घेतली जाईल.

कुंभ

आजचा दिवस फार शुभ आहे. सरकारी कामात यश मिळेल. वाहन किंवा घर घेण्याचा विचार आज सफल होऊ शकतो. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. प्रवासाचे योग संभवातील.

मीन

मान-सन्मान प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण संधी मिळतील. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशदायक दिवस.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com