

Mughal history Babur
esakal
Mughal Empire (1526–1857): मुघलांनी भारतावर साधारणपणे ३३१ वर्षे राज्य केलं. मुघल साम्राज्याची पायाभरणी केली ती बाबरने. तिथपासून ते औरंगेजबच्या मृत्यूपर्यंत मुघलांचा अत्यंत शक्तिशाली काळ होता. १५२६ ते १५३० हा बाबरचा काळ. तिथून पुढे मग हुमायून, अकबर, जहांगीर,शाहजहान, औरंगजेब आणि शेवटचा बहादूर शाह जफर हे मुघलांचे शासनकर्ते झाले.
जिथून मुघलांचा शासनकाळ सुरु झाला तो बाबर चक्क समलैंगिक होता. त्यानेच त्याच्या आत्मकथा असलेल्या 'बाबरनामा' पुस्तकात खासगी गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये त्याने आपल्या पहिल्या पत्नीबद्दलची अनास्था आणि 'बाबरी' नावाच्या एका मुलावर असलेल्या आपल्या प्रेमाचा अत्यंत प्रांजळपणे उल्लेख केला आहे.