Mysore Dasara : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाची जंबो सवारीने सांगता; अभिमन्यू हत्तीने वाहून नेली 750 किलो सोन्याची अंबारी

जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाची सांगता विजयादशमीदिनी (Vijayadashami) शानदार जंबो सवारीने झाली.
Mysore Dussehra Festival
Mysore Dussehra Festivalesakal
Summary

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री एच. सी. महादेवप्पा, राजघराण्याचे शाही वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी चामुंडेश्वरी देवीची पूजा केली.

बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाची (Mysore Dussehra Festival) सांगता विजयादशमीदिनी (Vijayadashami) शानदार जंबो सवारीने झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता.

Mysore Dussehra Festival
Dikshabhumi : बुद्ध धम्मातील तत्त्वांचा समावेश असलेलं, आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान सर्वात सुंदर आहे - देवेंद्र फडणवीस

त्यातच दहशतवाद्यांनी मिरवणुकीत घातपात घडवून आणण्याच्या दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्तात देश-विदेशातील हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने तितक्याच आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम झाला.

अभिमन्यू हत्तीने ७५० किलो सोन्याची अंबारी यशस्वीपणे वाहून नेली. अंबारीत राज्यदेवता चामुंडेश्वरी विराजमान होती. अंबारी राजवाड्यापासून बन्नी मंडपापर्यंत नेण्यात आली. आणखी १४ हत्तींनी अभिमन्यूला साथ दिली. या मिरवणुकीचे नेतृत्व पोलिसांच्या अश्‍वारूढ पथकाने केले.

Mysore Dussehra Festival
Karnataka : भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी! माजी मुख्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? 'या' युतीला केला विरोध

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री एच. सी. महादेवप्पा, राजघराण्याचे शाही वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी चामुंडेश्वरी देवीची पूजा केली. या आधी मुख्यमंत्र्यांनी नंदीध्वज पूजनात सहभाग घेतला. यावेळी कलापथक आणि चित्ररथांचे सादरीकरण झाले. राज्‍यातील ३१ जिल्ह्यांतील आणि विविध महत्त्‍वाच्‍या शासकीय विभागांचे भव्य चित्ररथ राजभवनातून निघा‍ले. ते शोभायात्रेचे आकर्षण बनले.

बळ्ळारी जिल्ह्याने हक्की-पिक्की जमातीच्या सांस्कृतिक पैलूंचे प्रदर्शन केले, तर बेळगाव जिल्ह्याने ऐतिहासिक महालिंगेश्वर मंदिराचा चित्ररथ सादर केला. बंगळूर शहर जिल्ह्याने इस्रोच्या ‘चांद्रयान-३’ यशाचे प्रदर्शन केले. कोलारने गारुडी नृत्य सादर केले, तर बिदरने वन्यजीव आणि चामराजनगरने प्रसिद्ध महादेश्वर मंदिराचा चित्ररथ सादर केला. चिक्कमगळूरने जिल्ह्यात उत्पादित विविध वनस्पती आणि प्राणी यांच्यासोबत सुगंधी कॉफीचे प्रदर्शन केले.

Mysore Dussehra Festival
मोठी बातमी! अमेरिकेच्या लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 ठार तर 60 नागरिक गंभीर जखमी, हल्लेखोराचा Photo केला जारी

या १० दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच कुस्ती हेही प्रमुख आकर्षण आहे. राजवाड्यातून मिरवणूक बन्नी मंडपापर्यंत पोहोचताच उत्सवाची सांगता झाली. यावेळी बाईक स्टंट, घोडेस्वारी, टेंट पेगिंग, लेझर लाईट आणि इतर अनेक साहसी खेळ सादर करण्यात आले. पोलिस प्रशिक्षणार्थींनी केलेली पणजीना परेड मंत्रमुग्ध करणारी होती.

Mysore Dussehra Festival
Tiger Claw Case : वाघाच्या पंजाप्रकरणी 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला अटक; अनेक सेलिब्रिटी अडचणीत, अभिनेत्यांच्या घरांची झडती

त्यांनी मशाल हातात धरून विविध आकृती तयार केल्या. दसरा उत्सवाच्या भव्य समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक जमले होते. देवी चामुंडेश्वरीने महिषासुराचा वध केल्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com