BJP-JDS Alliance Loksabha Election
BJP-JDS Alliance Loksabha Electionesakal

Karnataka : भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी! माजी मुख्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? 'या' युतीला केला विरोध

सदानंदगौडा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.
Summary

भाजपकडून सदानंदगौडा यांची बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कापण्याची शक्यता आहे.

बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजप-धजद युतीला (BJP-JDS Alliance) उघडपणे विरोध करणारे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा (DV Sadananda Gowda) यांना बुधवारी (ता. २५) हायकमांडने दिल्लीत बोलावले होते. ते पक्ष सोडण्याचा विचार करत असल्याचे समजल्यानंतर हायकमांड खाडकन जागे झाले आहे.

सदानंदगौडा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत. पक्षाच्या राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता धजदसोबत युती करण्यात आली. भाजपमधील ७५ टक्के कार्यकर्त्यांना ही युती पसंत नसल्याबद्दल त्यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती.

BJP-JDS Alliance Loksabha Election
Karnataka Politics : 'या' दोन बड्या नेत्यांमधला वाद टोकाला; हायकमांड करणार हस्तक्षेप, काँग्रेस सरकार धोक्यात?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करण्याची विनंती केली आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही सदानंद गौडा यांच्याशी संवाद साधला आहे. पक्षसुचनेनुसार मुख्यमंत्रीपदाचा त्याग करणारे सदानंदगौडा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रतिष्ठित रेल्वेखाते मिळाले.

Karnataka Former Chief Minister DV Sadananda Gowda
Karnataka Former Chief Minister DV Sadananda Gowdaesakal
BJP-JDS Alliance Loksabha Election
Maratha Reservation : मराठा समाजाचे एवढे आमदार असूनही आरक्षण देत नाहीत, पण आम्ही हे मुद्दाम..; काय म्हणाले अजितदादा?

नंतर मंत्रीपद काढून घेतले आणि त्यांना केंद्रीय कायदामंत्री करण्यात आले. नंतर त्यांना केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री करण्यात आले. जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी त्यांना पायउतार व्हावे लागले. बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सदानंद गौडा हे बी. एस. येडियुराप्पा यांच्यानंतर मुख्यमंत्री झाले. सदानंदगौडा यांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात येडियुराप्पा यांची महत्वाची भूमिका होती.

BJP-JDS Alliance Loksabha Election
Dikshabhumi : बुद्ध धम्मातील तत्त्वांचा समावेश असलेलं, आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान सर्वात सुंदर आहे - देवेंद्र फडणवीस

मात्र, भाजपकडून सदानंदगौडा यांची बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कापण्याची शक्यता आहे. मंड्या लोकसभेच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांना येथून बंगळूर उत्तरमधून उतरविण्याचा भाजप विचार करत आहे. पक्षनेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर सदानंदगौडा काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com