

Nag Panchami Story Behind Sister’s Vrat, Farming, and Cooking Rules
esakal
Nag Panchami Fasting & Traditions: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या पवित्र महिन्याची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते. यंदा १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमी साजरी केली जात आहे. भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावणात त्यांच्या गळ्यातील अलंकार म्हणजेच नागदेवतेची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्रात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणामागे धार्मिक श्रद्धेसोबतच निसर्ग आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे सुंदर बंध जोडलेले आहेत. पण, अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमीला बहिणी भावासाठी उपवास का करते? आणि या सणाचा शेती व स्वयंपाकाशी काय संबंध आहे? जाणून घेऊया या सणाशी जोडलेल्या महत्त्वाच्या परंपरा.