Bhadravati Nag Panchami Yatra: भद्रावतीत आजपासून नागपंचमी यात्रेला सुरवात; लाखो भाविकांचा ऊसळणार जनसागर, मंदिर परिसरात चोख बंदोबस्त

Nag Panchami 2025 celebration in Bhadravati: भद्रावतीत नागपंचमी यात्रेला आजपासून सुरुवात; मंदिर परिसरात कडक बंदोबस्त आणि लाखों भाविकांची गर्दी अपेक्षित.
Bhadravati Temple Nag Panchami Yatra
Bhadravati Temple Nag Panchami Yatra sakal
Updated on

Importance of Nag Panchami at Bhadravati Temple: येथील सुप्रसिद्ध तथा ऐतिहासिक भद्रनाग मंदिरात आजपासून (ता.२९) विदर्भातील सर्वात मोठ्या नागपंचमी यात्रेला सुरुवात होत आहे. यानिमित्ताने मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शहरातील भद्रनाग मंदिर हे अतिशय जागृत नागमंदिर असून विदर्भातील ते सर्वात मोठे नागमंदिर आहे. नागपंचमीला दरवर्षी या मंदिरात मोठी यात्रा भरते.

भद्रनागाच्या दर्शनासाठी संपूर्ण विदर्भातून भाविक येथे गर्दी करतात. या यात्रेला यशस्वी करण्यासाठी व भाविकांना सहजतेने भद्रनाग बाबाचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासन, नगर परिषद प्रशासन व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. श्रावण महिना लक्षात घेता विविध सामाजिक संघटनांतर्फे मंदिर परिसरात भाविकांसाठी फराळाचे स्टॉल लावले जाणार आहेत.

या दिवशी शहरात बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने पोलिस प्रशासनातर्फे शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. पहाटे श्री भद्रनाग स्वामींची आरती व अभिषेकानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहर तथा मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भद्रनाग स्वामी नवसाला पावणारे दैवत

शहरातील भद्रनाग स्वामींचे मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असून अत्यंत जागृत असल्याची भाविकांमध्ये मान्यता आहे. भद्रनाग स्वामी हे नवसाला पावणारे दैवत असल्याची मान्यता असल्याने नवस बोलण्यासाठी तथा नवस फेडण्यासाठी दररोज भाविक मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात. संपूर्ण हेमाडपंथी धाटणीचे असलेले सदर मंदिर हे विदर्भातील सर्वात मोठे नागमंदिर आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com