
पारशिवनी : तालुक्यातील बाबुरवाडा गावाजवळ वसलेले ''नागठाणा तीर्थक्षेत्र'' हे विदर्भातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते. निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या या तीर्थक्षेत्रात दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी हजारो भाविकांची मांदियाळी जमते.