
Nashik Rahada Rangapanchami: भारतात दिवाळी व्यतिरिक्त खूप उत्साहात साजरा होणार दुसरा सण म्हणजे होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खेळले जाणारे धुलिवंदन. संपूर्ण देशात होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुलिवंदनालाच रंग उधळले जातात. परंतु संपूर्ण देशात त्यातही महाराष्ट्रात असे एकमेव शहर आहे जिथे होळीनंतर पाच दिवसांनी म्हणजेच रंगपंचमीला रंग उधळले जातात.