
Shubh dreams during Navratri for financial success
Sakal
शारदीय नवरात्रीच्या काळात माता दुर्गेचे स्वप्न पाहणे अत्यंत शुभ मानले जाते.
हे स्वप्न तुमच्या आयुष्यात सौभाग्याचे आगमन दर्शवते आणि प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होण्याचे संकेत देते.
देवीच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ आणि यशाच्या नवीन संधी मिळू शकतात.
Navratri dreams that bring wealth and prosperity: हिंदू धर्मात शारदीय नवरात्राला खास महत्त्व आहे. हा सण देवी शक्तीच्या पूजेचा काळ मानला जातो. यंदा शारदीय नवरात्र सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि १ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्राच्या नऊ दिवसांत, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या काळात देवीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. स्वप्नांच्या शास्त्रानुसार, या काळात येणाऱ्या स्वप्नांनाही खास महत्त्व आहे. नवरात्रीतील काही स्वप्ने शुभ संकेत मानली जातात. नवरात्रीतील कोणती स्वप्ने विशेषतः शुभ मानली जातात ते जाणून घेऊया.