

Goddess Kathyayani
sakal
GODDESS KATYAYANI PUJA MANTRA AND NAIVEDYA: शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवीचे हे रूप शक्ती, धैर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, मनापासून देवीची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. योग्य जीवनसाथी मिळावा, यासाठीही देवी कात्यायनीची आराधना केली जाते. श्रीकृष्णाला पती म्हणून मिळवण्यासाठी वृंदावनातील गोपींनी देवी कात्यायनीची पूजा केल्याची पौराणिक कथा प्रचलित आहे. जाणून घेऊया देवीचे स्वरूप, पूजेची पद्धत, मंत्र आणि त्यांच्याशी संबंधित कथा.