esakal | नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ; कऱ्हाडात कृष्णाबाईच्या दर्शनासाठी गर्दी I Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival

दीड वर्षापासून असलेला कोरोना विळखा सैल झाल्याने लॉकडाउनमध्येही शिथिलता देण्यात आलीय.

कऱ्हाडात नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : मंदिरे दीड वर्षानंतर काल खुली झाली. घटस्थापनेने नवरात्र उत्सवास (Navratri Festival) शहरात प्रारंभ झाला असून सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून शांततेत दुर्गा मूर्तींची प्रतिष्ठापना केली. शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री कृष्णाबाईसह (Krishnabai Temple Karad) दैत्यनिवारिणी व अन्य मंदिरात दर्शनासाठी महिला व भाविकांनी गर्दी केली होती.

नवरात्र उत्सवास कालपासून प्रारंभ झाल्याने उत्साहाचे वातावरण होते. दीड वर्षापासून असलेला कोरोना विळखा सैल झाल्याने लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. सकाळपासूनच येथील कुंभारवाडा, गजानन हाउसिंग सोसायटी येथे दुर्गादेवीच्या मूर्ती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मूर्ती नेण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने आल्या होत्या. दुर्गामाता की जयच्या जयघोषात मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेल्या. मोठ्या भक्तिभावाने दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

हेही वाचा: कऱ्हाड : राज्यावरील सर्व संकट दूर कर; खासदार पाटलांचे खंडोबाला साकडे

कोरोनामुळे गेली दीड वर्षापासून बंद असलेली मंदिरे गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली करण्यात आली. नवरात्र उत्सवात मंदिरे खुली झाल्याने पहिल्याच दिवशी कृष्णाबाई व दैत्यनिवारिणी देवीच्या मंदिरासह शहर परिसरातील अन्य मंदिरात महिला व भाविकांनी गर्दी केली होती.

loading image
go to top