esakal | कऱ्हाड : राज्यावरील सर्व संकट दूर कर; खासदार पाटलांचे खंडोबाला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार पाटील यांनी पाल येथील श्री खंडोबा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले

कऱ्हाड : राज्यावरील सर्व संकट दूर कर; खासदार पाटलांचे खंडोबाला साकडे

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज घटस्थापनेपासून धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडली.  महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पाल (ता. कऱ्हाड) येथील श्री खंडोबाचे मंदिर देखील भाविकासांठी खुले झाले. पहिल्या दिवशी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाल येथे खंडोबाचे दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटातातून लवकर बाहेर पाडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्याठी नागरिकांना बळ द्यावे अशी प्रार्थना त्यांनी खंडोबा चरणी केली.

हेही वाचा: Human Development Index: भारताची यंदाही स्थानांमध्ये घसरण, नॉर्वे टॉपर!

खासदार पाटील यांनी पाल येथील श्री खंडोबा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. अनेक दिवसानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. खंडोबाचे दर्शन घेऊन कोरोनाचे संकटातून कायमस्वरूपी सुटका करावी. कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गासह नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यातून सावरण्यासाठी बळ द्यावे अशी प्रार्थना खंडोबा चरणी खासदार पाटील यांनी केली. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये एकाचवेळी गर्दी करू नये.करोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचं काटेकोर पालन करावे. शिस्त व सुरक्षितता बाळगून आपली जबाबदारी सर्वांनी पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पाल देवस्थानचे विश्वस्त देवराज पाटील, सर्जेराव खंडाईत, बाबासाहेब शेळके, संजय काळभोर, धनराज गुरव, जयवंत खंडाईत, प्रसाद गुरव उपस्थित होते.

loading image
go to top