
Good Luck Rituals to Perform on the First Day of Navratri for Success and Happiness
sakal
Navratri Remedies for Good Luck : सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येणारी नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र. ही नवरात्र खूप खास आणि हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाची मानली जाते. या नऊ दिवसात सगळे देवीचं नऊ रूपांची पूजा करतात. हा काळ असा आहे जेव्हा आपण देवीकडून ज्ञान, शक्ती आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी तिचे आशीर्वाद मागतो. घटस्थापनेपासून हा नऊ दिवसांचा सण सुरु होतो आणि दसऱ्याच्या दिवशी संपतो. घटस्थापनेच्या दिवशी बहुतांश घरांमध्ये घट बसतात. हा नवरात्रीचा पाहिलं दिवस असल्याने या दिवशी काही शुभ कार्य केल्याने आयुष्यात सुख समृद्ध नांदते आणि यश प्राप्ती होते. तुम्ही देखील पुढील गोष्टी या दिवशी पाळलया तर तुमचे आयुष्यही उजळेल.