
Rudraksha Niyam: चुकूनही घालू नका 'या' प्रकारचा रुद्राक्ष, जाणून घ्या रुद्राक्ष घालण्याचे नियम
महादेवाला रुद्राक्ष फार प्रिय आहे. मानलं जातं की जे लोक रुद्राक्ष घालतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा असते. मान्यतेनुसार महादेवाच्या प्रिय रुद्राक्षाची निर्मिती महादेवाच्या अश्रूंनी झाली होती. त्यामुळे रुद्राक्ष घालणं शुक्ष मानलं जातं. मात्र रुद्राक्ष घालण्याचे काही महत्वाचे नियम आहेत.
रुद्राक्ष अनेक प्रकारचे असतात. एक मुखी ते १४ मुखी असे रुद्राक्षाचे प्रकार असतात. प्रत्येक रुद्राक्षाचं एक वेगळं महत्व आहे. मनातून नकारात्मक विचार काढण्याबरोबरच वाईट वेळ घालवण्यातही रुद्राक्षाची भूमिका महत्वाची असते.मानलं जातं की रुद्राक्ष घातल्यानंतर प्रत्येक संकटातून आपला बचाव होतो. त्यामुळे रुद्राक्ष घालणं शुभ मानलं जातं. तुम्ही देखील रुद्राक्ष घालत असाल तर या नियमांना नक्की लक्षात ठेवा.
या प्रकारचा रुद्राक्ष घालू घालू नका
काही रुद्राक्षांमध्ये किडे पडतात ज्यामुळे ते खराब असतात. त्यामुळे रुद्राक्ष विकत घेताना काळजीपूर्वक बघून घ्यावं.
रुद्राक्ष तुटलेला किंवा खंडित असेल तर घालू नका.
कधी कधी रुद्राक्षात चूकीचे छिद्र असतात. असा रुद्राक्ष तुम्ही घातला असेल तर लगेच काढून टाका.
रुद्राक्ष घालताना तो पूर्ण वर्तुळ (गोल) असावा. तसेच त्यात दोरा टाकण्यास छिद्र असावं.
रुद्राक्ष काळ्या दोऱ्यात घालू नये. नेहमी रुद्राक्ष पिवळ्या किंवा लाल दोऱ्यात असावा.
रुद्राक्ष घातल्यानंतर महादेवचं मनन करावं. त्यानंतर शिव मंत्र 'ऊँ नम: शिवाय' चा जप करावा.

रुद्राक्ष घातल्यानंतर या नियमांचं करा पालन
रुद्राक्ष घातलेल्या लोकांनी मांसाहारापासून दूर राहावे.
घरी स्वच्छता ठेवण्याबरोबरच स्वत:लाही स्वच्छ ठेवावे.
रुद्राक्ष फार पवित्र मानल्या जातं. त्यामुळे त्यांना अशुक्ष हातांनी स्पर्श करू नका.
तुमचा रुद्राक्ष कोण्या दुसऱ्यास घालायला देऊ नका.
Web Title: Never Wear This Type Of Rudraksha Know Lord Shiva Rudraksha Wearing Rules
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..