November Lucky Zodiac Signs 2026
esakal
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर २०२६ मध्ये ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरला गुरु ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर १२ नोव्हेंबरला मंगळही सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत केतू आधीपासूनच असल्यामुळे गुरु, मंगळ आणि केतू यांची युती तयार होईल. ज्योतिषीय मान्यतेनुसार, ४ डिसेंबरपर्यंत ही युती कायम राहणार असून, त्यानंतर ५ डिसेंबरला केतू सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या ग्रहस्थितीचा चार राशींना विशेष फायदा होऊ शकतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.