Numerology : या अंकाची जन्मतारीख असणारे लोकं असतात सुपर टॅलेंटेड

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही तेवढंच ताकदीच मानलं जातं
Numerology astro tips
Numerology astro tips esakal

Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही तेवढंच ताकदीच मानलं जातं; ज्योतिष शास्त्रामध्ये जसं आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर अगदी सहज पद्धतीने मिळतात तशीच उत्तर अंकशास्त्रातही मिळतात. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून व्यक्तीचं भविष्य सांगितलं जातं.आपल्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून जो अंक येतो, त्याला जन्मांक असं म्हटलं जातं. जन्मांक किती आहे, त्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो.

Numerology astro tips
Astro Tips For Money : घरात पैसा टिकत नाही? करा हा उपाय

असा व्यक्तीची प्रतिभा दाखवणारा अंक म्हणजे 3

ज्या व्यक्तींच्या जन्म तारखेमध्ये 3 हा अंक आहे त्या सुपर टॅलेंटेड असतात. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यांना आपली प्रतिभा कशी दाखवायची आणि कशी वापरायची हेदेखील माहिती असतं. त्यांचा स्वभाव लवचिक असतो आणि त्या कितीही विचित्र परिस्थितीतसुद्धा काम करू शकतात.

Numerology astro tips
Astro Tips : आजार बरा होण्याचं नावचं घेत नाहीये? स्मशानभूमीतले हे उपाय करतील मदत

3 हा अंक गुरू ग्रहाशी संबंधित आहे. या अंकाशी संबधित असलेल्या व्यक्तींना त्यांचे गुरू, आई, शिक्षक आणि प्रशिक्षक यांचा सतत आशीर्वाद मिळतो. त्यामुळेच ते सर्वोत्तम खेळाडू, शिक्षक, फायनान्सर्स, कलाकार आणि कुक बनू शकतात.

Numerology astro tips
Astro Tips: 'हे' संकेत तुम्हालाही दिसतायेत? तर मग नक्कीच तुमचा शुभ काळ सुरू होणार

स्वभाव:

ही व्यक्ती विचारवंत, प्रतिभावान आणि जिज्ञासू असतात. त्या महत्त्वाकांक्षी, मनमिळाऊ, प्रॅक्टिकली विचार करणारी तरीही आध्यात्मिक आणि संयमी असतात. सगळ्यांना सोबत घेऊन चालणं त्यांना खूप छान जमत. मुळात ही लोकं खूप एनर्जेटिक असतात आणि या लोकांवर लगेच विश्वास ठेवतात. आजारपणाची कारणं बाजूला ठेवून आपल्या कामावर हे लक्ष देतात.

Numerology astro tips
Astro Tips : आत्ता कच्च्या दुधाने करा वक्री ग्रहांना शांत

करिअरसाठी पर्याय :

जन्मतारखेमध्ये 3 हा अंक असलेल्या व्यक्ती डिझायनर, शिक्षक, कंटेंट रायटर, कलाकार, सीए, सीए, संगीतकार म्हणून चांगलं काम करू शकतात. याशिवाय, या व्यक्तींना पत्रकारिता, राजकारण, वकिली, सल्लागार सेवा, मॅट्रेस, लेखा परीक्षण, केमिकल्स, फार्मास्युटिकल्स, आध्यात्मिक गुरू या क्षेत्रांमध्ये यश मिळू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com