

Numerology reveals ungrateful traits in Root Numbers
esakal
अंकशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा प्रभाव आपल्या स्वभावावर पडत असतो. काही अंक प्रेमाचे प्रतीक असतात, तर काही अंक अत्यंत व्यावहारिक आणि प्रसंगी कठोर मानले जातात. समाजात वावरताना आपण अनेकांना मदतीचा हात देतो, परंतु काही लोक असे असतात जे संकटाच्या वेळी घेतलेली मदत विसरून जातात. ज्याला आपण 'कृतघ्नता' म्हणतो, ती प्रवृत्ती विशिष्ट मुलांकांच्या व्यक्तींमध्ये अधिक दिसून येते असे अंकशास्त्र सांगते. हे लोक स्वार्थापोटी किंवा स्वतःच्या प्रगतीच्या ओघात इतरांच्या उपकारांची जाणीव ठेवत नाहीत, त्यामुळे अशा लोकांशी मैत्री करताना सावध राहणे गरजेचे असते.